तुमचे खाते सेट करण्यासाठी याला फक्त 15 मिनिटे लागतात
लिस्टिंग म्हणजे काय?
Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स सेल करण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम Amazon.in वर लिस्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रॉडक्ट कॅटेगरी, ब्रॅंडचे नाव, प्रॉडक्ट वैशिष्ट्ये आणि तपशील, प्रोडक्ट इमेजेस आणि किंमत यासारखी तुमची प्रॉडक्ट माहिती देऊ शकता. हे सर्व तपशील तुमच्या कस्टमरला तुमचे प्रॉडक्ट खरेदी करण्यात मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत (येथे दाखवल्याप्रमाणे).
Amazon.in वर प्रॉडक्ट लिस्ट कसे करायचे?
Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स दाखवण्यासाठी, तुम्ही ती तुमच्या Seller Central खात्यामधून खाली दिलेल्या दोन मार्गांपैकी एका मार्गाने लिस्ट करणे आवश्यक आहे:
(प्रॉडक्ट Amazon.in वर उपलब्ध असल्यास)
मॅच करून नवीन ऑफर जोडणे किंवा सेलर अॅप वापरून प्रॉडक्ट बारकोड किंवा ISBN स्कॅन करणे
तुम्ही सेल करत असलेले प्रॉडक्ट हे Amazon.in वर सेलसाठी आधीच उपलब्ध असल्यास, तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यासाठी ते निवडायचे आहे, तुम्हाला प्रॉडक्ट ज्या किमतीला सेल करायचे आहे ती किंमत आणि तुम्हाला किती युनिट्स सेल करायचे आहेत त्यांची संख्या टाकायची आहे.
तुम्ही खालील पद्धतींनी नवीन ऑफर जोडू शकता:
प्रॉडक्ट नाव, UPC, EAN किंवा ISBN वापरून तुमचे प्रॉडक्ट शोधा
(डेस्कटॉप आणि मोबाइलवर उपलब्ध)
UPC, EAN किंवा ISBN असलेल्या प्रॉडक्ट्ससाठी बारकोड स्कॅन करा
(सेलर अॅपवर उपलब्ध)
स्टॅंडर्ड आणि कस्टम अपलोड टेम्पलेट्स वापरून बल्कमध्ये तपशील अपलोड करा
(डेस्कटॉपवर उपलब्ध)
कॅटेगरी मंजुर्या
लिस्टिंग प्रक्रियेदरम्यान, तुम्ही विशिष्ट कॅटेगरीजसाठी काही अतिरिक्त दस्तऐवज किंवा माहिती देणे आवश्यक असेल. त्यांना गेटेड कॅटेगरीज म्हटले जाते आणि तुम्ही खाली त्याची सूचक लिस्ट शोधू शकता.
प्रॉडक्ट कॅटेगरी
आवश्यक दस्तऐवज
उदाहरण
ऑटोमोटिव्ह आणि सुरक्षा अॅक्सेसरीज
कार सीट्स
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
वाहने किंवा विमानांसाठी कार सीट्स
हेल्मेट्स
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
हेल्मेट्स, हार्ड हॅट्स आणि फेस शील्ड्स
बेबी प्रॉडक्ट्स
बेबी अॅक्टिव्हिटी गिअर
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
बेबी वॉकर इ.
बेबी डायपरिंग
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
बेबी डायपर्स, बेबी नॅपिज
बेबी स्ट्रोलर्स आणि कॅरियर्स
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
पुशचेअर्स, बेबी स्ट्रोलर्स/प्रॅम
बेबी फूड
इंव्हॉइस, फूड डेकोरेशन, FSSAI परवाना, प्रॉडक्ट पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) परवाना
बेबी सीरिअल, बेबी हेल्थ ड्रिंक्स, इतर बेबी फूड
बेबी फीडिंग
इंव्हॉइस, प्रॉडक्ट पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) परवाना
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
रेडिओने नियंत्रित करण्याच्या कार्स किंवा प्लेन्स
शिकण्यासाठी खेळणी
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
शिकण्यासाठी पझल खेळणी किंवा इलेक्ट्रॉनिक खेळणी
आउटडोअर आणि स्पोर्ट्स खेळणी
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
डार्ट गन्स, सॉफ्ट बॉल्स
टॉप बिल्डिंग ब्लॉक्स
इंव्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेजेस
ब्रिक्स खेळा, कंस्ट्रक्शन खेळणी
इतर कॅटेगरीज
चांदिचे दागिने
इंव्हॉइस आणि चांदिच्या प्युरिटी सर्टिफिकेट
चांदिच्या बांगड्या, पेंडंट्स
मोठी उपकरणे
तपशीलवार आणि अस्सल कॅटलॉग, वॉरंटी प्रॉमिस (भारत)
AC, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स आणि डिश वॉशर्स
संगीत
अधिकार मालकासाठी इंव्हॉइस किंवा परवाने
CD, DVD
कृपया लक्षात घ्या की, वर नमूद केल्याव्यतिरिक्त माहिती किंवा दस्तऐवजाची विनंती केली जाऊ शकते.
Amazon jargon:
ASIN
ASIN म्हणजे Amazon स्टॅंडर्ड आयडेंटिफिकेशन नंबर आणि आपोआप जनरेट केलेला 10-अंकी वर्ण. हा अल्फान्यूमरिक आयडेंटिफायर आहे जो कॅटलॉगमधून प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशनमध्ये मदत करतो. तुम्ही नवीन लिस्टिंग तयार करत असल्यास, तुमच्या प्रॉडक्टला नवीन युनिक ASIN आपोआप दिला जाईल.
तुमचे प्रॉडक्ट Amazon.in वर सेल करण्यासाठी उपलब्ध असल्यास, तुम्ही नवीन लिस्टिंग तयार करणे आवश्यक असेल, जेणेकरून कस्टमर्सना त्याविषयी सर्व संबंधित माहिती शोधता येऊ शकते. तुम्ही Amazon.in वर प्रॉडक्ट लिस्ट केल्यावर, तो आपोआप ASIN (Amazon स्टॅंडर्ड आयडेंटिफिकेशन नंबर) जनरेट करतो.
नवीन लिस्टिंगसाठी काही आवश्यक असलेले तपशील येथे दिले आहेत:
1.
शीर्षक
कमाल 200 वर्ण, प्रत्येक शब्दाचा पहिले अक्षर कॅपिटल करा
मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ हायलाइट करणारे लहान, वर्णणात्मक वाक्ये
5.
वैशिष्ट्यकृत ऑफर ("Buy Box")
तपशील पृष्ठावरील वैशिष्ट्यीकृत ऑफर कस्टमर्स "कार्टवर जोडा" वर क्लिक करू शकतील किंवा "आता खरेदी करा" वर क्लिक करू शकतील
6.
इतर ऑफर्स
भिन्न किंमत, शिपिंग पर्याय इ. ऑफर करणार्या एकापेक्षा अधिक सेलर्सनी सेल केलेले तेच प्रॉडक्ट.
7.
वर्णन
लिस्टिंगच्या शोध योग्यतेमध्ये सुधारणा करण्यासाठी कीवर्ड्स वापरून ऑप्टिमाइझ करा
Amazon jargon:
वैशिष्ट्यकृत ऑफर ("Buy Box")
Buy Box हा प्रॉडक्ट तपशील पृष्ठाच्या उजवीकडील पांढरा बॉक्स आहे जेथे कस्टमर्स खरेदीसाठी प्रॉडक्ट्स जोडू शकतात. एकापेक्षा जास्त सेलरने प्रॉडक्ट ऑफर केल्यावर, ते वैशिष्ट्यकृत ऑफर (“Buy Box”) साठी स्पर्धा करू शकतात. सेलर्सनी वैशिष्ट्यकृत ऑफर प्लेसमेंटसाठी पात्र ठरण्याकरिता परफॉर्मन्स आधारित आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. Amazon द्वारे फुल्फिलमेंट यासारख्या सेवा वापरल्याने, तुम्ही Buy Box जिंकण्याची तुमची संधी वाढवू शकता
तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या ब्रॅंडचे प्रॉडक्ट्स असल्यास, काळजी करू नका. तुमच्या सर्वात सामान्य गरजांची काळजी घेण्याचे मार्ग आमच्याकडे आहेत:
बारकोड्स नसलेल्या प्रॉडक्ट्ससाठी
GTIN सूट
तुम्ही सेल करत असलेल्या प्रॉडक्टमध्ये ब्राकोड किंवा ग्लोबल ट्रेड आयटम नंबर (GTIN) नसल्यास, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वर सेल करण्यासाठी GTIN सवलतीची विनंती करू शकता. आम्ही तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन केले आणि त्यास मंजुरी दिली की, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करू शकाल.
तुम्ही सेल करत असलेल्या प्रॉडक्ट्सचा निर्माता आणि ब्रॅंड मालक असल्यास, Amazon ब्रॅंड रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याचा विचार करा - जी एक मोफत सेवा आहे जी तुम्हाला तुमचे ब्रॅंड नाव वापरणार्या प्रॉडक्ट तपशील पृष्ठांचे उत्तम नियंत्रण देते.
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्वतः लिस्ट करत असल्यास, तुम्ही Seller विद्यापीठ मध्ये उपलब्ध असलेल्या व्हिडिओज आणि ट्युटोरियल्सद्वारे कधीही प्रक्रिया जाणून घेऊ शकता.
Amazon सेवा पुरवठादार नेटवर्क (SPN) तुम्हाला तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वर लिस्ट करण्यास मदत करण्यासाठी तृतीय पक्षीय व्यावसायिकांकडून सशुल्क सपोर्टदेखील मिळवू देते. SPN तुम्हाला फक्त लिस्टिंगमध्ये मदत करत नाही तर सेलरच्या सर्व आवश्यकतांची संपूर्ण काळजी घेऊ देते.
Amazon.in वर सेलसाठी ऑफर केलेल्या प्रत्येक प्रॉडक्टला आपोआप जनरेट केलेला ASIN (Amazon स्टॅंडर्ड आयडेंटिफिकेशन नंबर) मिळतो जो GTIN किंवा SKU पेक्षा वेगळा आहे. तुम्ही प्रॉडक्टसाठी ऑफर जोडत असल्यास, ASIN तसाच राहील. नवीन लिस्टिंग तयार करत असल्यास, तुमच्या प्रॉडक्टला आपोआप नवीन युनिक ASIN दिला जाईल.
SKU
SKU म्हणजे स्टॉक किपिंग युनिट जे लिस्टिंग तयार करताना सेलर्सद्वारे त्याच्या प्रॉडक्टला नियुक्त केला जातो जेणेकरून तो त्याच्या इंव्हेंटरीमध्ये प्रॉडक्ट्स ओळखू शकतो. प्रत्येक सेलरसाठी SKU युनिक असतो आणि एकच SKU 2 प्रॉडक्ट्सना नियुक्त केला जाऊ शकत नाही. तुम्ही लिस्टिंग तयार करताना SKU एंटर न केल्यास Amazon तुमच्यावतीने एक तयार करते.
GTIN
GTIN म्हणजे ग्लोबल ट्रेड आयटम नंबर्स (बारकोड्स) आणि सामान्यतः 10 ते 14 अंकी नंबर असतात. विविश प्रकारचे GTIN आहेत, Amazon वर वापरलेले सर्वात सामान्य GTIN म्हणजे युनिव्हर्स्ल प्रॉडक्ट कोड्स (UPC), इंटरनॅश्ल स्टॅंडर्ड बुक नंबर्स (ISBN), युरोपियन आर्टिकल नंबर (EAN) आणि जपानी आर्टिकल नंबर्स (JAN).
तपशील पृष्ठ
तपशील पृष्ठ हे एक असे पृष्ठ आहे जे कोणत्याही प्रॉडक्टविषयी तपशीलवार माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असताना कस्टमर त्या पृष्ठावर जातो. लिस्टिंग तयार करताना तुम्ही दिलेले प्रॉडक्ट तपशील आणि माहिती तपशील पृष्ठावर दिसते जी कस्टमरला खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रभावित करते.
MRP
MRP म्हणजे कमाल रिटेल किंमत. तुम्ही Amazon.in वर लिस्ट करण्याचा प्रस्ताव करत असलेल्या प्रॉडक्ट्सच्या संपूर्ण कॅटलॉगसाठी MRP जोडणे आवश्यक आहे. पुस्तके वगळता सर्व कॅटेगरीजमध्ये 18 मे 2018 पासून ऑफर तयार करण्यासाठी कमाल रिटेल किंमत ही आवश्यक फील्ड आहे.
कॅटेगरी मंजुरी
विशिष्ट प्रॉडक्ट कॅटेगरीजमध्ये लिस्ट करण्यापूर्वी सेलर्सनी Amazon कडून मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की कस्टमर्स Amazon.in वर विश्वासाने खरेदी करू शकतात आणि सुरक्षित, विश्वसनीय आणि कम्प्लायंट प्रॉडक्ट्सची व्यापक निवड करू शकतात.
GTIN सूट
GTIN सूट ही एक प्रक्रिया आहे जेथे तुम्ही Amazon ला प्रॉडक्ट्सना बारकोड न देता प्रॉडक्ट्स लिस्ट करण्याची परवानगी देण्याची विनंती करू शकता. या परिस्थितींमध्ये तुम्ही GTIN सूटसाठी अर्ज करू शकता: - तुम्ही ज्या प्रॉडक्टचे निर्माता/ब्रॅंड/प्रकाशक आहात अशी प्रॉडक्ट्स सेल करता आणि तुमच्याकडे बारकोड नाही. उदाहरणार्थ, खाजगी लेबल प्रॉडक्ट्स किंवा हॅंड-मेड प्रॉडक्ट्स - तुम्ही ब्रॅंड नसलेली प्रॉडक्ट्स सेल करता आणि तुमच्याकडे बारकोड्स नाहीत. उदाहरणार्थ, होलसेल प्रॉडक्ट्स. - तुम्ही बारकोड्स नसलेले पार्ट्स सेल करता. उदाहरणार्थ, ऑटोमोटिव्ह पार्ट्स. - तुम्ही बारकोड्स नसलेले प्रॉडक्ट बंडल्समध्ये सेल करता. उदाहरणार्थ, लेदर बेल्ट आणि वॉलेट असलेले पॅक किंवा दोन शर्ट्सचे पॅक यासारखे कस्टमाइझ केलेली बंडल्स.
ब्रॅंड रजिस्ट्री
Amazon ब्रॅंड रजिस्ट्री तुम्हाला Amazon वर तुमच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क्सचे संरक्षण करण्यात आणि कस्टमर्ससाठी अचूक आणि विश्वासू अनुभव तयार करण्यात मदत करते. सध्या, नोंदणीसाठी पात्र होण्यासाठी ब्रॅंड्समध्ये नोंदणीकृत ट्रेडमार्क असणे आवश्यक आहे. ब्रॅंड रजिस्ट्री तुम्हाला तुमच्या ब्रॅंडने उल्लंघन करण्यापासून मदत करते.
FBA
FBA म्हणजे Amazon द्वारे फुल्फिलमेंट. तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स Amazon फुल्फिलमेंट केंद्रांमध्ये पाठवता आणि आम्ही ती पॅक करून शिप करतो आणि तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टसाठी ऑर्डर प्राप्त झाल्यावर कस्टमर सेवा देतो. FBA ही एक सशुल्क सेवा आहे आणि तुमचा बिझनेस वाढवण्यात आणि आणखी कस्टमर्सपर्यंत पोहोचण्यात मदत करू शकते. कस्टमर्स रिटर्न्स देखील FBA द्वारे हाताळले जातात.
वैशिष्ट्यकृत ऑफर ("Buy Box")
एकापेक्षा जास्त सेलर प्रॉडक्ट ऑफर करत असल्यास, ते वैशिष्ट्यकृत ऑफर (“Buy Box”) साठी स्पर्धा करत असतील: प्रॉडक्ट तपशील पृष्ठावरीलसर्वात दृश्यमान ऑफर्सपैकी एक. सेलर्सनी वैशिष्ट्यकृत ऑफर प्लेसमेंटसाठी पात्र ठरण्याकरिता परफॉर्मन्स आधारित आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. Amazon द्वारे फुल्फिलमेंट सारख्या सेवा वापरून, तुम्ही तुमची Buy box जिंकण्याची संधी वाढवू शकता