Amazon सेलर > तुमचा बिझनेस वाढवा > Amazon वर प्रमाणित नूतनीकृत

नूतनीकृत आणि पूर्वीपासून मालकी असलेली प्रॉडक्ट्स सेल करा

Amazon Renewed द्वारे, Amazon.in वर लाखो कस्टमर्सना नूतनीकृत आणि पूर्वीपासून मालकी असलेली प्रॉडक्ट्स सेल करा
लॅपटॉप आणि Amazon बॉक्सेसचे सेलर

Amazon Renewed प्रॉडक्ट्स कोणते आहेत?

 • Amazon Renewed प्रॉडक्ट्स नवीन दिसण्यासाठी आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी दुरुस्त/नूतनीकृत केले जाऊ शकतात आणि त्याची चाचणी केली जाऊ शकते. दुरुस्त/नूतनीकृत करण्याची क्षमता म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये दुरुस्त करता येणारा आणि/किंवा नवीन किंवा नवीन सारख्या स्थितीवर अपग्रेड करता येणारा इलेक्ट्रिकल आणि/किंवा मेकॅनिकल घटक असणे आवश्यक आहे.
 • तुमच्या नूतनीकृत प्रक्रियेमध्ये सामान्यतः निदान चाचणी, दोष असलेले भाग बदलणे यांचा समावेश आहे जे स्वच्छ करणे आणि तपासणी आणि लागू असताना पुन्हा पॅक करणे या प्रक्रियेद्वारे केले जाते.
 • तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये नवीन प्रॉडक्ट्सकडून अपेक्षा असलेल्या सर्व संबंधित अ‍ॅक्सेसरीज असतात आणि किमान 6 महिन्याची सेलर बॅक वॉरंटी असते.

Amazon Renewed वर सेल का करायचे?

वर्तुळाकार बाण असलेले चेक मार्कचे चिन्ह
विशेष प्रोग्रॅमचा भाग बना
आमच्या गुणवत्ता निकषाची पूर्तता करणार्‍या आणि नूतनीकृत आणि पूर्वी मालकी असलेले प्रॉडक्ट सातत्याने पुरवत असलेल्या सेलरनाच Amazon Renewed वर सेल करण्याची परवानगी आहे
रेषांनी जोडलेल्या वर्तुळामध्ये कस्टमर्सचे चिन्ह
लाखो निष्ठावंत कस्टमर्सना सेल करा
सेलर समाधान मोजण्यासाठी असलेल्या दृढ कस्टमर समाधान उद्दिष्टांमुळे मिळणार्‍या उच्च कस्टमर विश्वासाचा आनंद घ्या
कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर Amazon लोगो असलेले चिन्ह
Amazon च्या विश्वासू ईकॉमर्स क्षमतांचा लाभ घ्या
Amazon च्या सेलिंग टूल्स आणि फुल्फिलमेंट क्षमतांमुळे तुम्हाला Amazon च्या जगभरातील मार्केटप्लेसेसमध्ये कस्टमर्सना नूतनीकृत प्रॉडक्ट्स सेल करता येतात
ग्रोथ चार्टचे चिन्ह
तुमचा नूतनीकृत बिझनेस वाढवा
Amazon Renewed वर सेल करून तुमचा बिझनेस वाढवा
आणि खरेदी करण्याचे अधिक पर्याय शोधणार्‍या
कस्टमर्सपर्यंत पोहोचा

तुम्ही काय सेल करू शकता

नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेल्या प्रॉडक्ट्सचे सेलर म्हणून पात्र ठरण्यासाठी, तुम्ही आमच्या प्रोग्रॅम धोरणांचे आणि प्रॉडक्ट गुणवत्ता धोरणांचे आणि नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेल्या प्रॉडक्ट्सच्या वॉरंटी आवश्यकतांचे पालन करणे आणि प्रोग्रॅम अटी आणि शर्ती स्वीकारणे आवश्यक आहे. पात्र ठरला की, तुम्ही आमच्या कस्टमर्सना खालील कॅटेगरीजमध्ये उत्तम किंमतीला नवीन प्रॉडक्ट्ससारखी उच्च गुणवत्तेची प्रॉडक्ट्स सेल करू शकता:
 • मोबाईल फोन्स
 • किचनची उपकरणे
 • कॅमेरा
 • पॉवर टूल्स
 • होम अप्लायन्सेस
 • पॉवर टूल्स
 • टेलिव्हिजन
 • टॅबलेट्स
 • वैयक्तिक कॉम्प्युटर्स
 • व्हिडिओ गेम्स कन्सोल्स

तुम्ही सेल करण्यास कशी सुरुवात करू शकता?

पायरी 1

Amazon वर सेलर बनण्यासाठी नोंदणी करा
Amazon Renewed वर नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेली प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम Amazon वर नोंदणीकृत सेलर बनणे आवश्यक आहे.

तुम्ही Amazon वर सेलिंग वर नवीन असल्यास, आम्हाला तुमचे खालील तपशील पाठवा आणि आम्ही तुम्हाला तुमचे सेलिंग अकाउंट सेट करण्यास देखील मदत करू.

पायरी 2

Amazon Renewed वर सेल करण्यासाठी पात्र व्हा
Amazon Renewed वर नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेली प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी पात्र ठरण्याकरिता, आम्हाला नवीन प्रॉडक्ट्ससारखी प्रॉडक्ट सेल करण्याच्या तुमच्या अनुभवाचे तपशील आवश्यक आहेत.

Amazon Renewed वर सेलर म्हणून पात्र ठरण्यासाठी तुम्ही खालील निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे:
 1. तुम्ही Amazon Renewed गुणवत्ता धोरण आणि प्रोग्रॅमच्या अटी आणि शर्ती ला सहमती देता
 2. खरेदी इनव्हॉइसेस
  • तुम्ही मॅन्यूफॅक्चरर असल्यास - ब्रँड मालकीचा पुरावा द्या (उदा. ट्रेडमार्क नोंदणी दस्तऐवज)
  • तुम्ही डिस्ट्रिब्युटर/रिसेलर असल्यास - अर्ज केल्यापासून मागील 90 दिवसांमध्ये खरेदीची किमान 8 लाख मूल्य (सिंगल किंवा एकापेक्षा अधिक इनव्हॉइसेस) असलेली इनव्हॉइसेस शेअर करा ज्यात प्रॉडक्टचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले असेल. तुम्ही इनव्हॉइसेसवर युनिट खरेदी अमाउंट खोडू शकता.
 3. प्रॉडक्ट इमेजेस – तुम्ही पुढील इमेजेस शेअर करणे आवश्यक असेल:
  • आयटम शिप केली जाणारी बॉक्सेस
  • शिपिंग बॉक्सच्या आत ठेवलेल्या प्रॉडक्टची बॉक्सेस.
  • बॉक्समधील प्रॉडक्टचे चित्र
  • प्रॉडक्टचे वरील, खाली आणि सर्व 4 बाजूंचे चित्र.
  • स्क्रीन चालू असताना प्रॉडक्टचे चित्र.
 4. वॉरंटी पुरवठादाराचे तपशील – तुम्ही तुमच्या सर्व प्रॉडक्ट्सवर किमान 6 महिन्यांची सेलर वॉरंटी देणे आवश्यक असेल.
  • ब्रॅंड तुमच्या प्रॉडक्ट्सच्या वॉरंटीला सपोर्ट करत असल्यास, त्या ब्रॅंडचा पुरावा (ब्रॅंडचा ईमेल) द्या जी तुम्ही सेल केलेल्या प्रॉडक्ट्सची मान्य वॉरंटी असेल. ब्रॅंडने पुष्टी करेपर्यंत रेसिड्युअल वॉरंटीला ग्राह्य मानले जाणार नाही.
  • तुम्ही वॉरंटी ऑफर करण्यासाठी तृतीय पक्षीय वॉरंटी पुरवठादारासोबत देखील भागीदारी करू शकता. तुम्ही टाय-अपची पुष्टी करण्यासाठी पुरावा सबमिट करणे आवश्यक असेल.
 5. तुम्ही अस्तित्त्वातील सेलर असल्यास, मागील 60 दिवसांचा तुमचा ODR 0.8% किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 6. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, इ. सारख्या मोठ्या उपकरणांच्या कॅटेगरीमधील विशिष्ट प्रॉडक्ट्स वगळता, Easy Ship आणि MFN सारख्या इतर चॅनेल्सद्वारे नूतनीकृत प्रॉडक्ट्सच्या फुल्फिलमेंटला प्रतिबंधित केले जाईल. Renewed वर सेल करण्यासाठी, तुम्ही FBA मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यामध्ये सेलर फ्लेक्स आणि Amazon संचालित फुल्फिलमेंट केंद्रांचा समावेश आहे.
 7. तुम्ही Apple वगळता कोणत्याही GL अंतर्गत लिस्ट करू शकाल कारण आमच्याकडे त्या ब्रॅंडमध्ये IN उपलब्ध नाही.

पायरी 3

सेल करण्यास सुरुवात करा आणि तुमचा बिझनेस वाढवा

तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाली की, तुम्ही तुमची नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेली प्रॉडक्ट्स लिस्ट करून किंवा अस्तित्त्वातील प्रॉडक्ट लिस्टिंग्जमध्ये तुमच्या ऑफर्स अ‍ॅड करून सेल करण्यास सुरुवात करू शकता.
कस्टमर्सनी ऑर्डर केल्यावर, तुम्ही ती स्वतः फुल्फिल करू शकता किंवा Amazon द्वारा फुल्फिलमेंट द्वारे ती फुल्फिल करू शकता.
तुम्ही वर नमूद केलेलल्या निकषाची पूर्तता करू शकत असल्यास, खालील बटणावर क्लिक करून आम्हाला तुमचे तपशील पाठवा. आम्ही तुम्हाला दिलेल्या फोन नंबर/ईमेलवर 14 बिझनेस दिवसांमध्ये तुमच्याशी संपर्क साधू. तुम्हाला कोणतेही प्रश्न असल्यास, cr-in@amazon.com वर आम्हाला ईमेल पाठवा

Amazon Renewed वर तुम्हाला नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेली प्रॉडक्ट्स सेल करण्यास मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

विनम्र,
Amazon Renewed टीम.

आजच सेल करण्यास सुरुवात करा

Amazon.in दररोज शोधत असलेल्या करोडो कस्टमर्सना तुमची नूतनीकृत आणि पूर्वीची मालकी असलेली प्रॉडक्ट्स सादर करा.