Amazon Seller > Grow Your Business > Amazon Business
AMAZON BUSINESS (B2B) सेलर प्रोग्रॅम

संपूर्ण भारतातील लाखो नोंदणीकृत बिझनेस कस्टमरना घाऊकपणे सेल करा

अस्तित्त्वातील सेलर आहात का?

B2B साठी नोंदणी करा

 

बिझनेसेसना घाऊकपणे सेल करा
Amazon Business वर इतक्या मोठ्या गोष्टीही करता येणे शक्य असल्याचे मला कल्पनाच नव्हती. एकाच वेळी, मला मागील महियात बिझनेस कस्टमरकडून 300 युनिटची घाऊक ऑर्डर मिळाली!
आशिश अमनश्रींग एंटरप्राइझेस

Amazon Business म्हणजे काय?

तुमच्या सर्व ऑफिस खरेदी आवश्यकतांसाठी Amazon Business हा एकमेव उपाय आहे. GST सक्षम प्रॉडक्टसह भारतातील सर्वात मोठ्या मार्केटप्लेसमधून खरेदी करून खर्च कमी करा. तुम्ही मॅन्यूफॅक्चरर असाल वा वितरक, तुमच्याकडे लहान बिझनेस असेल वा मोठे एंटरप्राइझ, Amazon Business मधील उपलब्ध पर्यायांमुळे तुम्हाला आणखी कस्टमरपर्यंत सहजपणे पोहोचता येते.

B2B सेलिंगची वैशिष्ट्ये आणि फायदे

तुम्ही Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅममध्ये मोफत नोंदणी करू शकता. याला फक्त काहीच मिनिटे लागतात.
आयकॉन: तरंगणारे डॉलर चिन्ह पकडलेले हात

जास्त कस्टमर, जास्त सेल्स

GST पडताळणी केलेल्या लाखो बिझनेस कस्टमरपर्यंत पोहोचा आणि वाढत्या सेल्स संधींमधून फायदा मिळवा
आयकॉन: पाना, गिअर आणि त्यावर तरंगणार्‍या पट्टीचे घर

जास्त सेल करा, कमी फीज द्या

मल्टी-युनिट क्वांटिटीजमध्ये सेल करा आणि आणखी युनिट सेल करण्यासाठी कमी फीज द्या
आयकॉन : दोन स्पीच बबल, मध्यभागी तीन बिंदू असलेला एक आणि हसरा चेहरा असलेला एक

B2B आणि B2C साठी एकच सेलर अकाउंट

Amazon Business साठी ऑटोमेटिक नोंदणी एकच सेलर अकाउंटमधून B2B आणि B2C दोन्हीसाठी तुमची इन्व्हेंटरी व्यवस्थापित करा ज्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही.
आयकॉन : मध्यभागी Amazon स्माईल लोगो असलेली शील्ड

मॅन्युअल इन्व्हॉइस तयार करण्यासाठी लागणारी मेहनत वाचवा

B2B इन्व्हॉइसेसवर इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्यासाठी बिझनेसेस चालू करण्याकरिता ऑटो-जनरेटेड GST इन्व्हॉइसेस द्या आणि GST रिपोर्ट वापरा
आम्ही Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅमसाठीची मोफत वेबिनार्स नियमितपणे आयोजित करतो. आत्ताच नोंदणी करा!
सुरुवात करण्यात मदत हवी आहे का?
यशाच्या कथा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Amazon B2B विषयी वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळवा
प्रोग्रॅमबद्दल अधिक जाणून घ्या
Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅम काय आहे?
Amazon Business (B2B) ही बिझनेस कस्टमर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली एक मार्केटप्लेस आहे. सेलर्सना देशातील बिझनेसेसपर्यंत पोहोचता यावे म्हणून Amazon Business त्यांना भारतातील सर्वात मोठी संधी देत आहे. सेलर्स बिझनेससाठी तयार केलेल्या वैशिष्ट्यांमधून फायदा घेऊ शकतात, जसे की रेफरल फी डिस्काऊंट, बिझनेस किंमत, क्वांटिटि डिस्काऊंट, GST वगळता किंमती आणि ऑटोमेटेड GST इन्व्हॉइसेस.
Amazon सत्यापित बिझनेस कस्टमर कोण आहे?
Amazon सत्यापित बिझनेस कस्टमर एक कस्टमर आहे ज्याने बिझनेस अकाउंट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून वैध बिझनेस लाइसेन्स तपशील प्रदान केले आहे आणि सार्वजनिक उपलब्ध डेटा आधारे Amazon सत्यापन करण्यात आले आहे.
Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅम आणि Amazon वर सेलिंग (B2C) यात मुख्य फरक काय आहे?
Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅममुळे सेलर्सना बिझनेस-टू-बिझनेस (B2B ट्रान्झॅक्शन अनुकूल सुविधा प्रदान करून बिझनेस कस्टमरच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करता येतात.
नोंदणी करा
Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅम मध्ये सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहे?
Amazon वर नवीन नोंदणी केलेल्या सर्व सेलर्सची B2B प्रोग्रॅममध्ये आपोआप नोंदणी केली जाते. बिझनेस इन्व्हॉइस बॅज फक्त B2B ऑफर्ससाठी चालू केले जातील जेणेकरून बिझनेस कस्टमरना त्यांना बिझनेस इन्व्हॉइस मिळू शकतील फक्त अशा ऑफर खरेदी करण्याचा पर्याय निवडता येईल.
Amazon Business (B2B) सेलर म्हणून प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी किती खर्च येतो?
Amazon.in वरील स्टॅंडर्ड फी शेड्यूल Amazon Business (B2B) सेलर्सनाही लागू आहे. तथापि, B2B ट्रान्झॅक्शन्ससाठी, बिझनेस कस्टमर्सना मल्टी युनिट क्वांटिटीज सेल करण्याकरिता सेलर्सना अतिरिक्त फी फायदा मिळतो.
एका Amazon Business (B2B) सेलरकरिता Seller Central मध्ये काय बदल होईल?
Seller Central च्या समग्र कार्यक्षमतेत बदल होणार नाही. तुम्हाला Seller Central मध्ये नवीन बिझनेस सुविधा पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या Seller Central होम पेजवर B2B टॅब दिसेल जेथून तुम्ही अतिरिक्त बिझनेस वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करू शकता.
मी माझे Amazon Business (B2B) सेलर स्टेटस कसे कॅन्सल करू शकतो?
तुम्ही Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅम मधून कधीही बाहेर पडू शकता. प्रोग्रॅममधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही Seller Central मध्ये माझ्या सर्व्हिसेस पेज (सेटिंग्ज> अकाउंट माहिती > माझ्या सर्व्हिसेस) वर जाऊ शकता. हे केवळ तुमच्या Seller Central अकाउंट मधील बिझनेस-टू-बिझनेस-विशेष सुविधाला काढून टाकते आणि तुमचे व्यावसायिक सेलर अकाउंटल कॅन्सल करत नाही त्यावर परिणामही होत नाही. कृपया पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी सेलर सपोर्टशी संपर्क साधा.
सुरुवात करत आहोत
मी Amazon Business (B2B) सेलर प्रोग्रॅम वरील ऑर्डर्स फुल्फिल करण्यासाठी FBA चा उपयोग करू शकतो का?
हो, तुम्ही बिझनेस-टू-बिझनेस (B2B)ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी देखील FBA चा उपयोग करू शकता.
मी माझी बिझनेस-टू-बिझनेस इंव्हेंटरी कोठे व्यवस्थापित करू?
तुम्हाला बिझनेस ऑर्डर्सकरिता वेगळी इन्व्हेंटरी ठेवण्याची आवश्यकता नाही. Seller Central मध्ये निर्देशित केलेल्या विद्यमान इन्व्हेंटरीचा (FBA अंतर्गत लिस्ट आहे की नाही) B2B करिताही विचार केला जाऊ शकतो. इनबाउंड शिपमेंट तयार करत असताना अंदाजे फीज दाखवल्या जातील आणि Seller Central मध्ये पेमेंट रिपोर्ट्सवर देखील फीज उपलब्ध असतील.
मी माझ्या B2B ऑर्डर्सकरिता टॅक्स रिटर्न कसे भरले पाहिजे?
तुम्हाला Seller Central वर उपलब्ध असलेल्या प्रत्येक B2B ऑर्डरकरिता ट्रान्झॅक्शन करताना टॅक्स रिटर्न्स भरावे लागतील आणि B2B रिपोर्ट (रिपोर्ट्स >टॅक्स डॉक्युमेंट लायब्ररी >मर्चन्ट टॅक्स रिपोर्ट > B2B रिपोर्ट वर जा) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बिझनेस कस्टमरच्या GSTIN चा उल्लेख करावा लागेल. हे बिझनेस कस्टमरला टॅक्स क्रेडिट क्लेम करणे सक्षम बनविण्यासाठी अनिवार्य आहे.
बिझनेस किंमत म्हणजे काय? हे "नियमित किंमत किंवा किरकोळ किंमत" पेक्षा कसे वेगळे आहे?
बिझनेस किंमत ही डिस्काऊंट दिलेली किंमत आहे जी Amazon Business (B2B) सेलर त्यांच्या बिझनेस कस्टमरला देऊ शकतात. ही किंमत केवळ बिझनेस कस्टमरसाठी उपलब्ध/दृश्यमान असेल. "नियमित किंमत" किंवा "स्टँडर्ड किंमत" किंवा "रिटेल किमत" ही तुमच्या सर्व Amazon कस्टमरसाठी असणारी किरकोळ किंमत आहे ज्या नॉन-बिझनेस संस्था आहेत आणि ज्या त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी प्रॉडक्ट्स खरेदी करतात आणि रीसेलसाठी नाही. तुमची बिझनेस किंमत ही तुमच्या नियमित किंमतीपेक्षा जास्त असू शकत नाही परंतु नियमित किंमती इतकी असू शकते.
एखाद्या प्रॉडक्टला बिझनेस प्राईस आणि रेग्युलर प्राईस असू शकते का?
होय. रेग्युलर प्राईस व्यतिरिक्त बिझनेस प्राईस सुद्धा अस्तित्वात असू शकते.
बिझनेस प्राईस नसल्यास बिझनेस कस्टमर माझे प्रॉडक्ट खरेदी करू शकते का?
होय. एक Amazon Business सेलर म्हणून, तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्ससाठी बिझनेस प्राईस न दिल्यास, बिझनेस कस्टमर तुमच्या किरकोळ किंमतीवर तुमची प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात.
क्वांटिटी डिस्काउंट काय आहे?
क्वांटिटी डिस्काउंट म्हणजे बिझनेस कस्टमरला घाऊक खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बिझनेस (B2B) सेलर्सनी वाढवलेली सूट.
मी एक बिझनेस ऑर्डर कशी ओळखावी?
ऑर्डर आयडीच्या पुढे दिसणारा बिझनेस बायर आयकॉन हा बिझनेस ऑर्डर असल्याचे दर्शवितो. ऑर्डर व्यवस्थापित करा वर जा आणि ऑर्डर ID च्या उजवीकडील बिझनेस खरेदीदार लेबल पहा.
बिझनेस इन्व्हॉइस म्हणजे काय? मला किरकोळ किंमतीला सेल केल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सकरिता बिझनेस कस्टमरला बिझनेस इन्व्हॉइस देणे गरजेचे आहे का?
जनरेट केलेल्या बिझनेस इन्व्हॉइसमध्ये कस्टमरच्या बिझनेसचे नाव, GST नंबर (असल्यास) आणि खरेदी ऑर्डर नंबर समाविष्ट असतो. हो, प्रॉडक्ट किरकोळ किंमतीमध्ये विकले गेले तरीही तुम्ही बिझनेस कस्टमरला बिझनेस इन्व्हॉइस देणे आवश्यक आहे.
बिझनेस ओन्ली ऑफर काय आहे?
तुम्ही सेट केलेले बिझनेस प्राईस आणि क्वांटिटी डिस्काउंट केवळ बिझनेस कस्टमरकरिता दृश्यमान असेल, तरीही रेग्युलर प्राईस सर्व कस्टमरकरिता दृश्यमान असेल. तथापि, तुम्ही केवळ बिझनेस कस्टमरला ऑफर देऊ इच्छित असल्यास तुम्हाला केवळ बिझनेस किंमत आणि नियमित किंमत प्रदान करून हे करता येईल.

तुमचा सेलर प्रवास सुरू करा

Amazon.in वर लाखो कस्टमर्स आणि बिझनेसेसना सेल करा

Amazon वर सेलिंगवर नवीन आहात का ?

सेलिंग सुरू करा

 

अस्तित्त्वातील सेलर आहात का?

B2B साठी नोंदणी करा